प्रिय व्यक्तीसोबत नात सुधारायच आहे? मग हा एक प्रश्न स्वतः ला विचारा | Question to Improve Your Relationship in Marathi | Relationship Tip

Question to Improve Your Relationship in Marathi | Relationship Tip

काय तुम्ही समजून घेण्यासाठी एकत आहात की फक्त रिप्लाय द्यायचा आहे म्हणून वाट बघत आहात? 

जेव्हा आपण तरुण असतो, आपल्याला अस वाटत की, आपण आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत वाद नाही घातला पाहिजे. आणि आपण तेच करतो. सहसा आपण भांडण नाही करत. 

पण आता मोठे झाल्यावर हे समजत आहे की न भांडणे हा नाती सुधारण्याचा मार्ग नाही. ते म्हणतात ना घरात भांड्याला भांडं लागतं. म्हणजे वाद होणे साहजिक आहे. 

पण तुमचे आई बाबा असूदेत की बहीण भाऊ किंवा GF/BF. जर एखाद्या नात्यामध्ये प्रगती आहे करायची आहे तर वाद होणारच. 

मग आता यावर नक्की उपाय काय आहे? 

कोणताही वाद किंवा भांडण अगदी यशस्वीरित्या मॅनेज करायची गुरुकिल्ली म्हणजे भांडणावर असा तोडगा काढणे जिथे तुम्ही दोघं सहमत असाल. दोन्ही बाजूंनी Understanding हवी तरच वाद झाला तरी त्यातून काहीतरी शिकून तुम्ही पुढे जावू शकता. 

मी एक प्रश्न विचारतो याचा उत्तर अगदी प्रामाणिकपणे द्या!

तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत किती वेळा भांडता? आणि भांडण झालं की कधी एकदा मी बोलतोय आणि माझे मुद्दे मांडतोय, अस तुम्ही करता? 

तुम्ही असं करता का? 

तुमचा पार्टनर बडबड करत आहे, हवं ते बोलत आहे आणि तुम्ही शांतपणे एकून घेत आहात. पण हे शांतपणे ऐकून घेणे तो काय बोलतोय हे समजून घेण्यासाठी नाही तर कधी एकदा तो शांत होतोय आणि मी बोलतोय, यासाठी तर नसते. 

जर तुम्ही अस करत असाल तर तुम्ही एकटे यात नाही. मी सुद्धा अस केलं आहे. किंवा आपण सगळेच अस करतो. 

आपण फक्त आपल्याला कधी बोलता येईल यासाठी वाट बघत असतो, यासाठी नाही मी समोरचा व्यक्ती नक्की काय बोलतोय हे नीट समजून घेण्यासाठी. 

या स्वभावात बदल कसा करायचा? 

हा स्वभाव जर बदलायचा असेल तर तुम्हाला सगळयात आधी तुमचा Mindset बदलला लागेल. जेव्हा पण तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत वाद घालाल तेव्हा अस समजा की हा वाद "आम्ही Vs प्रॉब्लेम" असा आहे. 

"मी Vs तू" या Mindset ने जर तुम्ही वाद संपवण्याचा प्रयत्न केलात तर तो अजूनच वाढत जाईल. तुम्ही तुमचे मुद्दे मांडणार मग समोरचा व्यक्ती त्याचे. आणि हे असच चालत राहणार जो पर्यंत नात पूर्णपणे खराब होत नाही. 

Conclusion

पुढच्या वेळी कोणाशीही भांडण झालं की सगळ्यात आधी विचार करा की नक्की यात भांडणात प्रॉब्लेम काय आहे, भांडणाच नक्की कारण काय आहे. 

समोरच्या व्यक्तीच अगदी शांतपणे एकून घ्या. फक्त तुम्हाला नंतर बोलायचं आहे म्हणून नाही तर नक्की कुठे इश्यू होत आहे हे नीट समजून घेण्यासाठी आणि मग बोला. 

मी अस सांगत नाही की अस करुन वाद होणारच नाहीत. वाद हे तर चालूच राहणार पण त्यांना कसं हॅण्डल करायचं यासाठी तुमचा Mindset योग्य असला पाहिजे. 

तरच वाद सहज मिटतील आणि परिणामी इतरांसोबत तुमची नाती सुधारतील. 

Post a Comment

Previous Post Next Post