जस आपण अंघोळ करून आपल्या शरीराची काळजी घेतो अगदी तसच आपल्या माईंडला नियमितपणे स्वच्छ ठेवण्याची गरज आहे.
आता ते कसं करायचं? त्यासाठी तुम्हाला लाइफमधून या पुढील 7 गोष्टी आधी दूर कराव्या लागतील. चला तर जाणून घेऊया त्या गोष्टी कोणत्या आहेत.
1. सहज विश्वास ठेवणे
व्यक्ती कोणीही असो तुम्ही त्यावर लगेच विश्वास ठेवता. हे लक्षात घ्या की सगळे व्यक्ती चांगले नसतात. म्हणून लगेच कोणावर विश्वास ठेवणे बंद करा.
तुम्ही जर लोकांवर सहज विश्वास ठेवत गेलात तर लोक तुमचा फायदा घेणार आणि शेवटी तुम्हाला त्याचा त्रास होईल. लोकांवर विश्वास ठेवा पण त्यांना नीट ओळखून.
2. बदल नको
तुम्ही आयुष्यात होणाऱ्या बदलांना नेहमीच घाबरता. लक्षात घ्या की बदल होणे हा प्रकृतीचा नियम आहे. सगळ्याच गोष्टी आहे तशाच राहत नाहीत. अगदी तसच सगळे माणसे आहे तशी राहत नाहीत.
लाईफमध्ये नवीन अनुभव असो की नवीन Challenges, सुरुवतीला त्यांची भीती वाटते पण त्यामुळे आयुष्यात गती आणि ग्रोथ मिळते.
3. भूतकाळात जगणे
लाइफमध्ये अनेकदा अस तुमच्यासोबत होईल की एखादी चांगली संधी तुमच्या हातातून निघून जाईल, तसेच एखादी चूक तुमच्याकडून होईल, अशा वेळी हातातून गेलेल्या गोष्टींचा विचार करत बसू नका.
असं केल्याने नुकसान तुमचंच हित असत. म्हणून भूतकाळातील अनुभवातून शिका आणि भविष्यासाठी मेहनत घ्या.
4. स्वतःची तुलना इतरांसोबत करणे
सतत स्वतःला इतरांसोबत तुलना करणे हा दुःखी होण्याचा बेस्ट मार्ग आहे. प्रत्येक व्यक्ती हा खास आणि वेगळा असतो. इतरांसोबत स्वतःची तुलना करून तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात हे लक्षात घ्या.
म्हणून तुमच्या Strengths ना ओळखा. त्यावर काम करा. आणि तुमच्या लाईफच्या प्रवासावर फोकस करा.
5. चुकीच्या कमिटमेंट करणे
आपल्याला इतरांना नाही बोलताना खूप त्रास होतो. याचा परिणाम काय होतो तर ज्या गोष्टी शक्य नाहीत त्यांना आपण हो मोकळे होतो.
पण अस तुम्ही स्वतः चा आणि समोरच्या व्यक्तीचा वेळ वाया घालवत असता. ज्या गोष्टी तुम्हाला शक्य नाही तिथे नाही बोलायला तुम्ही शिकल पाहिजे.
6. हार मानणे (तेही लगेच)
यश मिळणे हे काय एका दिवसामध्ये लगेच मिळत नाही. आज काम केलं आणि उद्या तुम्ही त्यात यशस्वी झालात अस कधीच होणार नाही.
यशस्वी व्हायचं आहे तर जिद्द आणि चिकाटी हवी. खूप सारे अडथळे येतील त्यांना मात करण्याची तयारी तुम्ही केली पाहिजे. खूप वेळा अस होत की तुझी ध्येयाच्या खूप जवळ असता पण तिथून तुम्ही मागे होता, तर ही चूक तुम्ही करू नका.
७. सोशल मीडिया स्क्रोलिंग (अगदी अंगठा दुखेपर्यंत)
अति प्रमाणात सोशल मीडियाचा वापर हा खूप घातक ठरू शकतो. १ रिल बघतो, एकची 2 रील होतात मग 3 आणि अस करता करता २ तास निघून जातात.
इन्स्ता असो की यूट्यूब किंवा इतर सोशल मीडिया ॲप्स, यांचा वापर करताना जाणीवपूर्वक करा.
Conclusion
जेव्हा तुम्ही या वाईट सवयींना दूर करता तेव्हा तुम्ही Positive Energy तुमच्या लाईफमध्ये घेऊन येता. नेहमी लक्षात ठेवा की Self Improvement हा एक सतत चालणारा प्रवास आहे. यामधे प्रवासात तुमच्या प्रोग्रेसला एंजॉय करत स्वतःचा एक Best Version बना.
पोस्ट आवडली असेल तर शेअर करा. तुमचे काही विचार असतील तर कॉमेंटकरून नक्की सांगा. वाचत रहा, शिकत रहा. दररोज 1% बेटर बना. ✌
