आजच्या सोशल मीडियाच्या जगात, आपण सतत इतरांशी तुलना करत असतो. असे वाटते की आपण एका स्पर्धेत आहोत जिथे सगळे आपल्याला मागे टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.
आपण इतरांच्या सोशल मीडिया प्रोफाइलमधील फोटोंवरून आपले जीवन कसे आहे हे ठरवतो. पण खरं तर, आपली खरी लढाई इतरांशी नाही तर स्वतःच्या सोबतच आहे.
तुमचे खरे शत्रू कोण आहेत?
1. तुमच्या सवयी:
ज्या कामांना आपण आपोआप करतो त्यांना सवयी म्हणतात. पण याच सवयी आपले आयुष्य बनवू शकतात आणि बिघडवू शकतात.
तुम्ही दिवसभर सोशल मीडियावर स्क्रोल करत बसता का? मग स्क्रोलिंगऐवजी तो वेळ तुम्ही काहीतरी नवीन शिकण्यासाठी वापरू शकता. आपल्या वाईट सवयींना चांगल्या सवयींसोबत बदला.
2. तुमचा कमकुवतपणा:
आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काही कमी असते. त्या लपवण्यापेक्षा त्यावर काम करा. कमकुवतपणा हे एका दिवसात गायब होणार नाही. त्यासाठी महिने किंवा वर्षे लागतील.
मला आठवतं आहे की, इंग्रजीमध्ये वाचणे हा माझा कमकुवतपणा होता. पण मी हिम्मत करून इंग्रजी पुस्तके वाचायला सुरुवात केली. हळूहळू इंग्रजी सुधारलं आणि ज्ञानही वाढलं.
3. तुमचे व्यसन:
व्यसन हे शारीरिक किंवा मानसिक असू शकते. शारीरिक म्हणजे दारू, सिगरेट इत्यादी.
पण मानसिक व्यसन जसे की सतत कामात टाळाटाळ करणे, सतत नकारात्मक विचार करणे इत्यादी.
4. तुमचे ध्येय:
तुमची काय स्वप्ने आहेत जी तुम्ही डोळे उघडे ठेवून पाहत आहात? स्वप्नं फक्त एक इच्छा म्हणून राहू नयेत.
तुमचे ध्येय काय आहे ते पूर्ण करण्यासाठी योजना बनवा, त्यानुसार दिवसरात्र मेहनत घ्या. एक दिवशी तुम्हाला या मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल.
तुमची स्पर्धा तुमच्यासोबतच आहे म्हणून
ध्येयावर लक्ष केंद्रित करा:
फोन, सोशल मीडिया, मित्र इत्यादी अनेक गोष्टी आपले लक्ष विचलित करू शकतात. पण ध्येयावर काम करताना लक्ष विचलित करणारे घटक टाळा.
छोटे विजय साजरे करा:
कोणताही बदल घडवून आणण्यासाठी वेळ लागतो. छोट्या छोट्या यशांचा आनंद घ्या. या प्रवासात हळूहळू पुढे जात राहा.
स्वतःला माफ करा:
चुका होतील. हार मानण्याचा विचार येईल.
कधी कधी असे दिवस येतील जेव्हा तुम्हाला ध्येयासाठी काम करण्याची इच्छाच होणार नाही.
अशा वेळी थोडा वेळ विश्रांती घ्या. काहीच बिघडणार नाही. पण पुन्हा उत्साहाने सुरुवात करा.
निष्कर्ष
जीवन हा एक वैयक्तिक प्रवास आहे. इतरांशी तुलना करू नका. तुमच्या कमकुवतपणावर काम करा आणि तुमच्या सामर्थ्याचा विकास करा. मेहनत घ्या आणि तुमची सर्वोत्तम आवृत्ती बनण्याचा प्रयत्न करा.
तुम्हाला All the Best👍
पोस्ट आवडली असेल तर शेअर करा. तुमचे काही विचार असतील तर कॉमेंटकरून नक्की सांगा. वाचत रहा, शिकत रहा. दररोज 1% बेटर बना. 🚀
