2019 मध्ये कॉलेजमध्ये असताना मी पहिल्यांदा "Think and Grow Rich" हे पुस्तक वाचल होत. या पुस्तकातील धडे माझ्या अजून लक्षात आहेत. आज मी पुन्हा जवजवळ 4 वर्षानी हे पुस्तक पुन्हा वाचायला घेतल.
पुस्तकामध्ये सांगितल आहे की तुमचे विचार किती पावरफुल आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या लाइफमध्ये हव ते मिळवू शकता.
या पुस्तकातील 5 महत्वाचे धडे मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि ते पुढीलप्रमाणे:
1. तुमचे विचार = तुमची रीयालिटि
आपले विचार हे आपल्याला दिसत नाहीत पण त्यांच्यामध्ये एवढी पॉवर आहे की आपल्या लाइफमध्ये खूप सारे बदल घडवून आणू शकतात.
तुम्ही कोणतीही Achievement घ्या तिची सुरुवात एका साध्या विचाराने होते.
• एक्झॅममध्ये चांगले मार्क हवेत हा एक विचार होता पण तुम्ही त्यावर काम केलत आणि त्याचे परिणाम तुम्हाला मिळाले.
• चांगली नोकरी मिळवणे या एक विचार असतो पण त्यासाठी तुम्ही मेहनत घेतली आणि तुम्हाला नोकरी मिळाली.
• चांगली हेल्थ हवीय, बॉडी हवीय हा एक विचार असतो, त्यासाठी तुम्ही मेहनत घेतलीत, जीममध्ये घाम गाळलात. याचा परिणाम आज तुम्ही फिट आहात.
तुम्ही कोणतही काम घ्याम आधी तो एक विचार असतो. म्हणून चांगले विचार करा. त्यासाठी मेहनत घ्या. यश तुमच आहे एवढ नक्की.
2. आधी आत्मविश्वास मग यश
जर तुमच्यात आत्मविश्वासाची कमी असेल तर तर एखादी आयडिया डोक्यात आहे, एखाद काम सुरू करायच त्यावर Action घेऊ शकत नाही.
तुमच्या आतमध्ये जो आत्मविश्वास आहे त्याला ओळखा. हे लक्षात घ्या की प्रत्येक व्यक्ती स्वतावर Doubt घेतो की माझ्याने हे काम होईल ना? मी Fail तर होणार नाही? आणि असे अनेक विचार.
पण एक गोष्ट लक्षात घ्या यश हे त्यांनाच मिळत जे स्वतावर आधी विजय मिळवतात, स्वतच्या शंकावर विजय मिळवतात.
3. जशी एनर्जि तुमच्यात आहे तशी एनर्जि तुम्ही Attract करता
जर तुमचे विचार वाईट असतील तर तुम्ही वाईट विचारांच्या माणसांना Attract करता. आणि जर तुमच्यात Positive Attitude असेल तर तुम्ही तशाच माणसांना Attract कराल.
तुमची एनर्जि, तुमचे विचार हे नेहमी चांगले ठेवा. लाइफमध्ये चांगल्या गोष्टी व्हायला वेळ लागणार नाही. जगाला Positive एनर्जि द्या, समोरून तुम्हाला Positive एनर्जि मिळेल.
4. तुमचा विश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता
तुमचा विश्वास हा तुमच्या यशाचा पाया आहे. तुम्ही तुमच्या क्षमतेवर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे.
तुमच जे ध्येय आहे त्याचा विचार तुम्ही तुमच्या माइंडमध्ये केला पाहिजे. ते ध्येय पूर्ण केल्याची कल्पना तुम्ही सगळ्यात आधी तुमच्या माइंडमध्ये करा.
आणि हा विश्वास तोपर्यन्त पकडून ठेवा जोपर्यन्त तुम्ही ते ध्येय Achieve करत नाही.
5. तुमच्यामध्ये काही करण्याची ज्वलंत इच्छा असायला हवी
एखाद्या गोष्टीच Passion तुमच्यात असायला हव. आता हे Passion खूप जबरदस्त असल पाहिजे. अशी कोणती गोष्ट आहे जी केल्याशिवाय तुम्हाला जमतच नाही.
जर मनात तुमच ध्येय प्राप्त करण्याची ज्वलंत इच्छा असेल तरच तुम्ही
• त्यासाठी दिवसरात्र मेहनत घ्याल
• तुम्ही Comfort Zone च्या बाहेर जावून काम कराल
• काही गोष्टी सोडाव्या लागल्या तरी तुम्ही त्यासाठी तयार असाल (झोप, ट्रॅवल, सोशल मीडिया इ)
पोस्ट आवडली असेल तर शेअर करा. तुमचे काही विचार असतील तर कॉमेंटकरून नक्की सांगा. वाचत रहा, शिकत रहा. दररोज 1% बेटर बना. ✌
फॉलो करा 👉Threads App
जॉइन करा 👉Dailyhunt App
