मानवी मनाला समजणे हे एक कठिण कोडच आहे. एखाद्या व्यक्तीकडे बघून, तो कसा हसतोय यावरून तसेच तो किती झोप घेत आहे यावरून त्याच्या मनात काय चाल आहे हे समजू शकता.
आजच्या पोस्टमध्ये आपण अशा ५ सायकोलॉजीचे सिक्रेट्स समजून घेणार आहोत ज्याच्या मदतीने कोण कस वागतय आणि का वागतय याचा अंदाज लावू शकता.
ते 5 सायकोलॉजी सिक्रेट्स पुढीप्रमाणे:
1. खूप झोप येतेय? आनंदी नाही याचं लक्षण असू शकत
खूपच झोप घेणे यामागे काही मेडिकल कारणे असू शकतात. पण काही वेळा अस होत की एखाद्या व्यक्तीला काही मेडिकल प्रॉब्लेम नसतात पण तो खूपच झोप घेत आहे.
या अती झोपेच कारण तो व्यक्ती आनंदी नाहिये किंवा त्याच्यामध्ये कमी एनर्जी आहे हे असू शकते.
याउलट जर एखादा व्यक्ती झोपतच नाहीये तर तो कदाचित स्ट्रेस किंवा Anxiety चा शिकार झाला आहे असे असू शकते.
2. छोट्या छोट्या गोष्टीवरून डोळ्यात पाणी येतं? म्हणजे तुमचं मन साफ आहे.
आता कोणी रडत असेल तर आपल्याला वाटत की तो व्यक्ती नक्कीच Sad आहे किंवा त्याच्या मनासारखं काही झालं नाहीये.
पण रडणे किंवा डोळ्यात लगेच पाणी येणे हे एक सहानुभूती आणि भावनिक कनेक्शनचे चिन्ह आहे.
जर तुमचा कोणी मित्र असेल किंवा मैत्रीण, जे सहसा काही सांगितल की रडतात तर याचा अर्थ असा होतो की इतरांचे दुःख त्यांना लगेच कळतात.
3. खूपच हसू येतंय? कदाचित तो व्यक्ती आतून खूप दुःखी आहे.
एखाद्याच हसणे हे एवढं छान असत की इतरांना हसू आणून देऊ शकत.
पण अनेक वेळा अस होत की जर एखादा व्यक्ती सतत खूप खुश आहे तर तो नक्कीच मनात काहीतरी लपविण्याचा प्रयत्न करत आहे.
पुढच्या वेळी तुमच्या आजूबाजूला असा कोणी व्यक्ती असेल किंवा तुमचा कोणी मित्र असेल जो खूपच खुश आहे तर त्याला एकदा विचारा की नक्की त्याच दुःख काय आहे.
4. सतत खोटं बोलणे? कदाचित तो व्यक्ती Insecure असेल
लोक अनेक कारणांसाठी खोटं बोलतात. पण जे सतत खोटं बोलणारा व्यक्ती असतो तर तो स्वतः Insecure असणे तसेच कोणी त्याला Judge करेल यासाठी खोटं बोलत असतो.
असे लोक नेहमीच सत्य परिस्थिती लपवण्याचा प्रयत्न करतात. खोटं बोलून चांगल सांगण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना भीती असते की जर मी खर बोललो तर लोक माझ्याबद्दल काय विचार करतील.
5. खूप कमी बोलणे (कदाचित तुम्ही Mentally खूप Strong आहात)
खुप बोलणे किंवा सतत बडबड करणे ही सवय ज्या लोकांना शांत राहता येत नाही, याचा अर्थ असा नाही की ते खुप Strong आहेत..
याउलट जे लोक लोक खूप कमी बोलतात त्यांना आपण त्यांना कमजोर बोलू नाही शकत. अनेकदा अस होत की एखादा व्यक्ती जास्त बोलत नाही किंवा बोलला तरी कोणा खास व्यक्तीसोबत सगळ्या गोष्टी शेअर करतात.
अशी माणसे आधी सगळ एकून घेतात आणि मग कमी शब्दात त्यांचे विचार मांडतात. कमी बोलणे पण महत्त्वाचं बोलणे हे सुध्दा एक स्किल आहे. असे लोक नेहमीच मनाने Strong असतात.
नेहमी लक्षात ठेवा
हे पक्के नियम नाहीत तर ही काही चिन्हे आहेत ज्यावरून कोणी कसा वागतो, बोलतो आणि त्याचा मनात नक्की काय चालल आहे हे तुम्ही माहीत करून घेऊ शकता..
पण जेव्हा तुम्ही तुमच्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींना नोटीस करतां तसेच स्वतःच वागणं नोटीस करता तेव्हा इतरांच्या भावना समजून घेणे तुमच्यासाठी सोप होते.
याचा फायदा काय होतो? तुमचं स्वतःसोबत तसेच इतरांसोबतची नाती सुधारतात.
पोस्ट आवडली असेल तर शेअर करा. तुमचे काही विचार असतील तर कॉमेंटकरून नक्की सांगा. वाचत रहा, शिकत रहा. दररोज 1% बेटर बना. ✌
फॉलो करा 👉Threads App
जॉइन करा 👉Dailyhunt App
