सवयी आपल आयुष्य बनवत असतात आणि बिघडवत असतात. तुम्हाला जर आयुष्यात तुमची जी ध्येय आहेत ती Achieve करायची असतील तर चांगल्या सवयी विकसित करा.
पण चांगल्या सवयी विकसित करण्याआधी काही वाईट सवयी आपल्यामध्ये असतात त्यांना आळा घालणे गरेजच आहे.
अशा 5 सवयी तुम्ही आजच बदलल्या पाहिजेत त्या पुढीलप्रमाणे:
1. स्वताची तुलना इतरांसोबत करणे आजच थांबवा.
तुम्ही तुमच्या आयुष्यात एक वेगळ्या प्रवासात आहात. तुमच्या लाइफचा पहिला भाग हा इतरांच्या पहिल्या भागापेक्षा नेहमीच वेगळा असेल.
जर तुम्ही स्वताच्या प्रवासाची इतरांसोबत तुलना करता तेव्हा जास्त नुकसान तुमचच होत असत.
ते किती पुढे गेले, ते किती चांगल करत आहेत, मीच मागे राहिलो इ. गोष्टी बोलून तुम्ही तुमच आयुष्य कठीण करत आहात.
म्हणून तुम्ही जिथे आहात तिथून पुढे कस जाता येईल याचा विचार करा. कोण तुमच्या पुढे आहे किंवा मागे हेबघणे आजच बंद करा.
2. पैसे कमवायच्या आधीच गमावू नका
हे कस शक्य आहे? पैसे कमविले नाहीच तर गमावणार कसे?
एक साध उदाहरण घेऊ. ऑफिसमध्ये तुम्हाला बोनस मिळणार आहे याची घोषणा आज बॉसने केली. ऑफिसमध्ये सगळेजण खुश आहेत.
लगेच कुठे फिरायला जायच याचे प्लान बनायला सुरुवात झाली. कोणता नवीन फोन आलाय याच्या यूट्यूबवर विडियोस बघायला लागलात.
थोडक्यात काय तर, अजून पैसे नाही आले पण ते कसे आणि कुठे खर्च होणार याची तयारी झाली. यालाच म्हणतात कमविण्याआधी गमविणे.
ही सवय बदलली पाहिजे नाहीतर कधीच तुम्ही पुरेशी सेविंग करू शकणार नाही.
3. नवीन गोष्ट किंवा आयडिया ट्राय करायची भयंकर भीती
जो पर्यन्त तुम्ही एखादी गोष्ट ट्राय करणार नाही तो पर्यन्त तुम्हाला कस कळेल की ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य आहे की नाही.
समजा तुम्हाला फोटोग्राफी शिकायची आहे तर यासाठी हातात फोन घेऊन किंवा कॅमेरा घेऊन बाहेर पडाव लागेल. विविध प्रकारचे फोटोस काढावे लागतील. तेव्हा कुठे तुम्हाला समजेल की फोटोग्राफी तुमच्यासाठी आहे की नाही ते.
ट्राय करा, त्यातून शिका, जमल तर ठीक नाहीतर दुसरी गोष्ट तुमची वाट बघत असेल एवढ नक्की.
4. कुठेही जा तुम्ही नेहमी उशिरा येता
कॉलेजचे सगळे फिरायला चालले आहात. मित्र स्टेशनवर येऊन तुमची वाट बघत आहेत पण तुमचा काही पत्ता नाही. 5 मिनिटात येतो सांगून आता अर्धा तास झाला. आता ही सवय कॉलेजमध्ये असताना चालून जाते. मित्र आहेत ते वाट बघतात. समजून घेतात.
पण जेव्हा तुम्ही एका ऑफिसमध्ये जॉबसाठी जाता तेव्हा हीच सवय तुम्ही ग्रोथमधील अडथळा बनते. तिथे तुम्हाला सतत कोणी समजून घेणार नाही. आणि बॉस तर एक संधी बघत असतो तुम्हाला बोलायची.
म्हणून कधीही वेळेवर आलेल बर. सगळ्यात बेस्ट म्हणजे वेळेच्या आधी येणे. ना कसली घाई, ना कसल टेंशन.
5. वेळेवर न झोपणे
तुम्ही लास्ट टाइम कधी वेळेवर झोपला होतात? आठवत आहे का तुम्हाला?
नाही ना.
आजकाल रात्री झोपताना पहिला फोन हातात लागतो त्याशिवाय झोप येतच नाही. एक रील पहिली मग दुसरी मग तिसरी. अस करत करत कधी 2 तास होतात काळत नाही.
आणि मग झोपायच आणि सकाळी उशिरा उठायच. त्यात पण शरीरात चांगली एनर्जि नसते म्हणून पूर्ण दिवस खराब जातो. आणि हे चक्र असंच चालू राहत.
पुरेशी झोप न घेतल्याने खूप सारे Health Issues तुम्हाला बघायला मिळतील. (आता लगेच नाही कारण तुम्ही आता तरुण आहात. पण जस जस वय होत तस तस हे आजार दिसायला सुरुवात होते.
- Stroke
- Diabetes
- Heart Failure
- High Blood Pressure
- इत्यादी आजाराची रिस्क असते.
पोस्ट आवडली असेल तर शेअर करा. तुमचे काही विचार असतील तर कॉमेंटकरून नक्की सांगा. वाचत रहा, शिकत रहा. दररोज 1% बेटर बना. ✌
फॉलो करा 👉Threads App
जॉइन करा 👉Dailyhunt App
