चूक झाली मान्य करा (कारण यात फायदा तुमचा आहे) | How to Win Friends and Influence People Book in Marathi

How to Win Friends and Influence People Book in Marathi

"How to Win Friends and Influence People" हे कम्युनिकेशन स्किल्स सुधारण्यासाठी लिहिलेल्या पुस्तकांपैकी एक बेस्ट पुस्तक आहे. 

यामध्ये लेखक Dale Carnegie सांगतात की जर तुमच्याकडून एखादी चूक झाली मग ती चूक छोटी असो की मोठी लगेच मान्य करा. 

कारण?

यामध्ये फायदा हा तुमचाच असेल. ते कसं काय हे जाणून घेण्यासाठी ही पुढील छोटी गोष्ट वाचा. 👇

लेखक Dale Carnegie त्यांच्या कुत्र्याला फिरवण्यासाठी त्यांच्या घराच्या जवळच्या एका पार्कमध्ये जात असतं. आता पार्क म्हंटल तिथे इतर लोक, लहान मुले तसेच इतर छोटे मोठे प्राणी असत जस की खार इ. 

आता त्या पार्कमध्ये कुत्रा फिरवताना कुत्र्याच्या तोंडाला कव्हर लावणे हा तिथला नियम होता. पण Dale Carnegie यांच्या कुत्र्याला त्याच्या तोंडाला बंद केलेलं अजिबात आवडत नसे. 

एक दिवशी असच पार्कमध्ये कुत्रा फिरवताना तिथला एका पोलिसाने Dale Carnegie यांना पाहिलं आणि तो त्यांना म्हणाला, "तुम्हाला कळत कस नाही? याला असच फिरवत आहात? तो कोणाला चवला तर? 

त्यावर Dale Carnegie म्हणाले, "मला नाही वाटत तो कोणाला चावेल" 

हे ऐकून तो ऑफिसर अजूनच चिडला आणि म्हणाला, "तुम्हाला काय वाटतं हे म्हतवाच नाहीये, नियम जो आहे तो आहे. यावेळी मी तुम्हाला सोडत आहे पण पुढच्या वेळी काळजी घ्या"

Dale Carnegie शांतपणे म्हणाले की, "अशी चूक पुन्हा नाही होणार". आणि तो ऑफिसर तिथून जातो. 

पुढचे काही दिवस Dale Carnegie त्यांच्या कुत्र्याच्या तोंडाला कव्हर लावून फिरवत असत. पण हे फक्त काही दिवस चाललं कारण त्यांचा कुत्रा तोंडाला कव्हर लावल मी खूप दंगा करत असे. 

एक दिवशी हिम्मत करून Dale Carnegie यांनी त्या कुत्र्याच्या तोंडावरच कव्हर काढून त्याला पार्कमध्ये फिरवत होतो आणि जे नको व्हायला पाहिजे होत नेमक तेच झाल. त्या ऑफिसरने Dale Carnegie यांनी पाहिलं. 

तो रागारागाने त्यांच्याकडे येऊ लागला पण तो त्यांना काही सूनवणार त्या आधीच Dale Carnegie म्हणाले की, " ऑफिसर माझी चूक झाली. तुम्ही मला सांगितल होत की कुत्र्याला फिरवताना तोंडाला कव्हर लावा. मी हा नियम तोडला आहे. मला माफ करा..

हे ऐकून तो ऑफिसर जरा शांत झाला. तो Dale Carnegie यांना म्हणाला ही ठीके. तुम्ही फिरवा याला इथे पण लक्ष ठेवा. 

Dale Carnegie म्हणाले "तो कोणाला चावू शकतो ऑफिसर". त्यावर तो ऑफिसर म्हणाला तुम्ही उगाचच नको ते विचार करताय. तुम्ही लक्ष ठेवा काही नाही होणार आणि तो ऑफिसर गेला. 

आता इथे नक्की काय झालं? या गोष्टीचा तात्पर्य काय आहे? 

Dale Carnegie सांगतात की चुका तर होतात पण ते मान्य करण्यात आपली भालाई असते. जर तुम्हाला माहित आहे की तुम्ही चूक केली आहे आणि त्याची जाणीव पण तुम्हाला आहे तर मान्य करण्यात शहाणपण आहे. 

कारण? 

तुमच्या चुकीसाठी कोणी दुसरा व्यक्ती तुम्हाला नको नको ते बोलेल तर तुम्हाला कसं वाटेल? म्हणून कोणी दुसरा व्यक्ती तुम्हाला काही बोलण्याआधी तुम्ही चूक मान्य केलेली चांगली असते. अस केल्याने त्या समोरच्या व्यक्तीचा राग खूप खूप कमी होतो. 

असं करून तूम्ही जरी चूक केली असेल तरीही शेवटी तुम्ही जिंकणार आहात अस लेखक Dale Carnegie सांगतात. 

पुढच्या वेळी जर एखादी चूक तुम्ही केलीत तर मोठ्या मनाने तो मान्य करा आणि बघा क्या काय होत. तुम्हाला नक्कीच फरक दिसेल.

पोस्ट आवडली असेल तर शेअर करा. तुमचे काही विचार असतील तर कॉमेंटकरून नक्की सांगा. वाचत रहा, शिकत रहा. दररोज 1% बेटर बना. ✌

फॉलो करा 👉Threads App 
जॉइन करा 👉Dailyhunt App 

Post a Comment

Previous Post Next Post