कोणत्याही कामात पूर्णपणे फोकस कस रहायच? | How to Stay Focused? | Indistractable Book in Marathi

How to Stay Focused? | Indistractable Book in Marathi

आजच्या पोस्टमध्ये आपण “Indistractable” by Nir Eyal या बुकमधील काही महत्वाचे धडे समजून घेणार आहोत. 

या बुकमध्ये फोकस राहण्यासाठी तसेच आजूबाजूला असलेल्या Distractions पासून वाचण्यासाठी खुप साऱ्या प्रॅक्टिकल टिप्स दिल्या आहेत. जर तुम्ही तुमचा खूप सारा वेळ फोनमधील सोशल मीडिया ॲप्सवर घालवता? मग तुम्हाला ही बुक नक्कीच आवडेल.

या बुकमधील 3 धडे पुढीप्रमाणे: 

1) फोनला तुमच्यापसून दूर ठेवा (खूप खूप दूर) 

जेव्हा पण तूम्ही एखाद काम करायला किंवा स्टडी करायला बसता तेव्हा तुमच्या फोनला तुमच्यापासून खूप दूर, किंवा दुसऱ्या ठिकाणी ठेवा आणि हो बेस्ट म्हणजे सायलेंटवर ठेवा.

का? 

काही स्टडीजमध्ये हे सिद्ध झाले आहे की जेव्हा फोन तुमच्या नजरेसमोर असतो तेव्हा त्याला सतत चेक करावं असं वाटतं राहत. कोणता मेसेज येऊदे की नको येऊदे सतत फोन चेक कराव वाटतो.

आणि जर तुम्ही फोन तुमच्या नजरेआड ठेवलात, अगदी स्वतःपासून दूर तर तुमचा मेंदू जे काम तुम्ही हातात घेतलय त्याकडे पूर्ण फोकस होतो. 

आणि जर खूपच गरजेचं असत तुम्हाला जवळ ठेवणे तर त्याची रिंग रिंग, टिंग टिंग बंद ठेवा. आणि फोन समोर जरी ठेवला तरी उलट ठेवा जेणेकरुन एखादा मेसेज आला तरी तुमचं कामाकडे दुर्लक्ष होणार नाही. 

2) 10-Minute Rule चा वापर करून Distractions ला हरवा 

पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही काही महत्त्वाचं काम करायला घ्याल आणि तुम्हाला काही वेळाने फोन वापराव अस वाटेल तेव्हा जरा वेळ थांबा. 

तुम्हाला फोन का वापरायचं आहे यावर विचार करा. तुम्हाला जे वाटतं ते तुझी लिहून काढू शकता. 

याने फायदा असा होतो की तुम्ही सतत हे काम म्हणजेच फोन चेक करणे का करत आहात याच खर कारण तुम्हाला समजत. आणि दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही १० मिनिटे थांबता तेव्हा ही फोन चेक करायची सवय तुम्ही मोडत असता. 

उदाहरणार्थ, आता मी ही ब्लॉग पोस्ट लिहीत आहे. आणि मला आता जरा वेळ यूट्यूब बघावस वाटत आहे. (कारण तेच आहे की जरा बर वाटेल, मुड ठीक होईल) 

पण मी जरा वेळ विचार केला की हे करणं गरजेच आहे का? जर मला ब्लॉग लिहायला सुचत नसेल तर की बुक वाचू शकतो. किंवा बाहेर चालायला जावू शकतो. (फोन चेक करायची ऐवजी तुम्ही दुसरं कोणत चांगल काम करू शकता याचा विचार करा) 

जर तुम्ही हा रुल फॉलो केलात आणि फोन चेक करण्याआधी १० मिनिटे वाट पाहिलीत तर तुम्हाला काही दिवसांनी एक गोष्ट जाणवेल की सतत फोन चेक करायची सवय कमी होत आहे. १० मिनिटे थांबल्याने फोन चेक करायची इच्छा कमी होत आहे. 

आणि एकदा इच्छा गेली की तुम्ही तुमच्या कामात पूर्णपणे फोकस होवू शकता. 

3) 4 R चा वापर करून तुमच्या फोनवर कंट्रोल मिळवा. 

जेव्हा एखादी चांगली गोष्ट होते, जेवढे त्याचे फायदे असतात तेवढेच त्याचे नुकसान पण असतात. आजकालचे स्मार्टफोन त्यापैकी एक आहे. स्मार्टफोन घेतल की मग त्यासोबत त्याचा Addiction पण आलाच. 

पण तुमच्या फोनने तुम्हाला कंट्रोल करण्याआधी तुम्ही त्याला कसं कंट्रोल करू शकता हे बघा. आणि यासाठी तुम्ही 4R या टेक्निकचा वापर करु शकता. कस ते पुढीप्रमाणे 👇

Remove: जे ॲप्स तुम्ही वापरत नाही किंवा खूपच Distract करतात त्यांना Uninstall करा. 

Replace: तुम्ही सोशल मीडिया ॲप्स सहसा मोबाईलवर वापरत असणार. शक्य झालं तर त्यांना लॅपटॉप किँवा PC वर वापरा. याने काय होत तुम्ही सतत लॅपटॉपसोबत घेऊन जावू शकत नाही. नो लॅपटॉप नो सोशल मीडिया.

Rearrange: जे ॲप्स मोबाईल स्क्रीनवर बघून सतत वापरावे वाटतात त्यांना होम स्क्रीनवरून हटवा. किंवा Gray Mode चा वापर करा. याने काय होत पूर्ण फोन अगदी Gray होवून जातो. सतत फोन वापरावं अस वाटत नाही. 

Reclaim: नोटिफिकेशन सेटिंग बदला. जे ॲप्स सतत वाजत राहतात त्यांचे नोटिफिकेशन बंद करा. खास करून Whats App, YouTube, Insta इ. (Do Not Disturb वर फोन ठेवून मग एखादं काम करायला घ्या.) 

पोस्ट आवडली असेल तर शेअर करा. तुमचे काही विचार असतील तर कॉमेंटकरून नक्की सांगा. वाचत रहा, शिकत रहा. दररोज 1% बेटर बना. 🚀

फॉलो करा 👉Threads App 
जॉइन करा 👉Dailyhunt App 

Post a Comment

Previous Post Next Post