आनंद! हा शब्द आपण किती सहज वापरतो पण आनंद मिळवणे ही आयुष्यभराची शर्यत असते. |
पण जर मी तुम्हाला सांगितल की आनंदी राहणे किंवा होणे यासाठी तुम्हाला कुठे बाहेर बघायची गरज नाही तर तुमच्या आयुष्य जगण्याच्या दृष्टिकोनात बदल करणे आहे.
आणि हा बदल घडवून आणण्यासाठी तुमची हेल्प करतील हे पुढील ५ सत्य:
1. तुमच्या आनंदासाठी तुम्हीच जबाबदार आहात
इतर लोक तुझी आनंदी राहायचं की नाही हे ठरवणार नाही कारण ते तुम्हालाच ठरवायचं आहे. आनंदी राहणे एक जाणीवपूर्वक केलेली निवड आहे.
आनंदी राहणे याचा अर्थ असा होत नाही की लाईफमध्ये येणाऱ्या संकटांना सामोरे न जाणे किंवा संकटांना इग्नोर करणे. संकट आणि अडचणी तर येत राहतील पण त्या आल्यावर तुम्ही त्यावर कसं React होता हे जास्त महत्त्वाचं आहे.
लाईफमध्ये एक Positive Attitude ठेवा. अशा लोकांसोबत रहा जे तुम्हाला हेल्प करतील. स्वतः च्या आनंदाची जबाबदारी स्वतः घ्या आणि तुम्हाला हवं तस आयुष्य जगा तेही आनंदाने.
2. स्वतः वर जी बंधने लादली आहेत त्यांना दूर करा
आपण स्वताला नेहमीच कमी लेखत असतो की मी स्मार्ट नाहीये, माझाने हे काम होणे नाही. आणि अस बोलून आपण आपल्या स्वप्नांच्यामध्ये अडथळे आणत असतो.
पण जर तुम्ही नीट लक्ष दिल तर ही सांगली बंधने आपण स्वताच लादलेली असतात. यांना दूर करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या Mindset मध्ये बदल करायचा असतो.
- वाईट विचारांना दूर करा
- Comfert Zone मधून बाहेर या
- आणि Action घेण्यावर फोकस करा
लक्षात घ्या की छोटी मोठी प्रोग्रेस करत राहणे लाइफमध्ये ग्रोथसाठी गरजेची आहे. प्रत्येक गोष्टीत परफेक्ट होण्याचा प्रयत्न करत राहिलात तर तुम्ही कधीच कोणत काम करू शकत नाही.
स्वतावर विश्वास ठेवा. खूप सारे मार्ग उघडे होतील.
3. लाइफमध्ये सगळ्यासाठी तयार राहता नाही येत (काही गोष्टी अचानक होतात)
लाइफमध्ये चढ उतार येत असतात. कधी खूप सारा आनंद तर खूप सर टेंशन येत. पण लाइफ ही अशीच चालते. काही गोष्टी अचानक होतात की त्यावर तुमचा काहीच कंट्रोल नसतो.
जर तुम्ही प्रत्येक वेळी तुमच्या लाइफवर पूर्ण कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत राहिलात तर तुम्हाला कधी न कधी Disappoint व्हाव लागेल. कधी कधी पूर्ण प्लान करून केलेली कामे अटकतात.
लक्षात घ्या की लाइफमध्ये येणारे अनपेक्षित गोष्टी या संधी असतात लाइफमध्ये ग्रो करण्यासाठी. जेव्हा तुम्ही या अनपेक्षित गोष्टीना योग्य Mindset ने सामोरे जाता, तुम्ही नको ते टेंशन आणि स्ट्रैस दूर करता.
4. चुका होतील ओण त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा
आपण सगळे चुका करतो. माणूस म्हटल की चुका तर होणारच. पण एखादी चूक झाली की तिला घेऊन बसायच, त्यावर रडत बसायच यात नुकसान आपलच होत असत.
तुम्ही आधी चूक केलीत म्हणून आता भविष्यात पण अशीच चूक होईल याची भीती बाळगून तुम्ही लाइफमध्ये पुढे जावूच शकत नाही.
यापेक्षा तुमच्याकडून झालेल्या चुकांमधून काय शिकता येईल ते बघा. नक्की काय चुकल? पुन्हा ही चूक कशी होणार नाही हे बघा. मागील चुकांचा अनुभव घेऊनच तुम्ही भविष्यात योग्य निर्णय घेऊ शकता.
5. तुम्ही ज्या माणसांवर जिवापाड प्रेम करता ते तुमच्यासोबत आयुष्यभर नसतील.
आयुष्य खूप मौल्यवान आहे. काळाच चक्र सतत चालू असत. तुम्ही ज्या लोकांवर खूप प्रेम करता ते आयुष्यभर तुमच्यासोबत राहणार नाहीत म्हणून त्यांना आता वेळ द्या.
त्यांना कधीच गृहीत धरू नका. जितक शक्य होईल तितक त्यांच्यासोबत चांगल्या आठवणी बनवा. वेळोवेळी त्यांच्यावर असलेले प्रेम व्यक्त करा.
जर आज तुम्ही तुमच्या आवडत्या माणसांसोबत आठवणी बनवाल, ते नसतील पण त्यांच्या आठवणी तुमच्यासोबत नक्कीच असतील.
Conclusion
लाइफच्या या 5 कटू सत्यांना समजून घेऊन तुम्ही लाइफसाठी असा मार्ग बनवीता जो ध्येय, ग्रोथ आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमचा आनंद याने भरलेल असेल. असा आनंद जो तुम्ही स्वता बनवणार आहात.
फॉलो करा 👉Threads App
जॉइन करा 👉Dailyhunt App
