काय लाईफमध्ये फसल्यासारखं झालं आहे? काही प्रोग्रेस होत नाहीये असं वाटत आहे? ध्येय आहेत पण ती पूर्ण होतील की नाही याची सतत तुम्हाला काळजी वाटते?
असं वाटणारे तुम्ही एकटे नाही. आणि एक खरं सत्य तुम्हाला सांगतो: सहा महिन्यासाठी केलेले अथक प्रयत्न तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतात.
आता तुम्हाला यावर कदाचित विश्वास बसत नसेल, पण पुढे वाचा मग तुम्हाला सगळं काही नीट समजेल.
पण सहा महिनेच का?
हा एक जादुई आकडा नाही. पण सहा महिने एक योग्य टाइम फ्रेम आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या वाईट सवयी बदलू शकता. तसेच नवीन, चांगल्या सवयी विकसित करू शकता.
टाइम आणि फोकस: एक जबरदस्त जोडी
टाइम:
कोणत्याही कामात सातत्याने केलेली मेहनत हीच यशाची गुरुकिल्ली असते. विचार करून बघा की तुम्ही पुढचे सहा महिने एखाद्या नवीन स्किल शिकायला देणार आहात. सहा महिन्यानंतर तुम्ही नक्कीच त्या स्किलवर मात केली असेल.
फोकस:
तुमच्यामध्ये खूप डेडिकेशन आहे पण तुम्हाला कुठे जायचं आहे, तुमचं ध्येय नक्की काय आहे याची कल्पनाच नाहीये. हे म्हणजे असं झालं की बाहेर गाडी चालवायला निघालो पण मॅपसोबत नाही.
एखादं ठराविक ध्येय ठरवा, त्यासाठी प्लॅन बनवा आणि तुमची पूर्ण एनर्जी ते ध्येय साकार करण्यासाठी लावा.
सहा महिन्यांची कमाल:
काही प्रेरणादायी उदाहरणं जे तुम्हाला ऍक्शन घेण्यास प्रवृत्त करतील.
1) नवीन बिझनेस
कधीपासून तुमच्या डोक्यात एक बिझनेस आयडिया आहे. आज सुरु करेन, उद्या करेन अस करत तुम्ही ती आयडिया टाळत आहात. पण कधी विचार केलात की फक्त सहा महिने या आयडियावर पूर्णपणे फोकस करून, हवी ती रिसर्च करून तुम्ही हा बिझनेस सुरु करू शकता.
2) नवीन स्किल
तुम्हाला नवीन भाषा शिकायची असो की ग्राफिक डिझायनिंग. स्किल कोणतेही असो सहा महिन्यांची मेहनत तुमच्यासाठी खूप साऱ्या संधी उपलब्ध करून देऊ शकतात.
3) तुमची फिटनेस
कधीपासून तुम्हाला पोट कमी करायचं आहे. हो की नाही? आणि फक्त 6 महिने योग्य तो आहार घेऊन तसेच व्यायाम करून तुम्ही तुमच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक मोठा बदल घडवू शकता.
सहा महिन्याचा ऍक्शन प्लॅन असा बनवा
1. ध्येय स्पष्ट करा
तुम्हाला नक्की काय अचीव्ह करायचं आहे ते ठरवा. आणि हे ठरवताना स्पेसिफिक आणि मेझरेबल रहा. उदाहरणार्थ: फक्त मला फिट व्हायचं आहे असं बोलून चालणार नाही तर नक्की किती वजन कमी करायचं आहे ते ठरवलं पाहिजे.
2. मोठ्या ध्येयाचे छोटे टास्क करा
तुमचं जे ध्येय आहे त्याला तुम्ही छोट्या छोट्या टास्कमध्ये वाटून द्या जेणेकरून दररोज काहीतरी प्रगती करताय हे तुम्ही जाणवू शकाल. यामुळे तुमची प्रेरणा कायम राहील आणि यश मिळवण्याची गतीही वाढेल.
3. एक प्लॅन बनवा
तुम्हाला डेली काय करायचं आहे, वीकली काय करायचं आहे याच्या स्टेप्स स्पष्ट करा. तुमचं ध्येय गाठण्यासाठी दिवसभरात तुम्हाला किती वेळ द्यावा लागेल, हे ठरवा. तुमचा हा प्लॅन तुमच्या दैनंदिन दिनचर्या आणि तुमच्याकडे असलेल्या वेळेवर अवलंबून असेल.
उदाहरणार्थ:
- फिटनेस ध्येय: दररोज सकाळी 30 मिनिटे व्यायाम आणि संध्याकाळी हेल्दी डिनर.
- नवीन स्किल शिकणे: दररोज संध्याकाळी एक तास त्या स्किलवर अभ्यास.
4. प्रोग्रेस ट्रॅक करा
तुम्ही कुठपर्यंत पोहोचला आहात, तुमच्या प्लॅननुसार काम होत आहे की नाही, अजून काही एक्स्ट्रा काम करावं लागेल इत्यादी गोष्टी तुम्ही आवर्जून ट्रॅक करा.
जसे की तुमचे वजन कमी झाले आहे का? नवीन भाषा शिकण्यात किती प्रगती झाली आहे? यासारखी माहिती नोंदवून ठेवा. ट्रॅक केल्याने तुमची प्रेरणा वाढण्यास मदत होईल आणि जर काही बदल करायचे असतील तर तुम्ही करू शकता.
5. हार मानू नका, टिकून रहा
ध्येयसाठी मेहनत घेताना काही दिवस असे येतील की सगळं सोडून द्यावं, बंद करावं असं तुम्हाला वाटेल. पण या चॅलेंजेसना घाबरून तुम्ही ध्येयापासून दूर जावू नका.
जेव्हा तुम्हाला गिव्ह अप करावसं वाटेल तेव्हा आठवा की तुम्ही हे सगळं का सुरू केलं आहे. तुमच्या ध्येयाची आणि आतापर्यंत केलेल्या मेहनतीची आठवण करा आणि पुन्हा जोमाने पुढे जा.
निष्कर्ष
सहा महिने हा कालावधी किंचित मोठा वाटतो, पण तुम्ही कामाला लागलात की हा वेळ झटपट निघून जाईल. २०२४ ची सुरुवात झाली आणि एप्रिल महिना अर्धा संपायला आला. (ज्या वेळी मी ही पोस्ट लिहित आहे), त्यावरूनच दिसून येतंय की वेळ किती वेगाने निघून जाते.
म्हणून तुमचं ध्येय ठरवा आणि पुढच्या सहा महिन्यांत तुम्ही तुमचं ध्येय पूर्ण करणारच असा दृढ निश्चय करा.
नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या यशाची तयारी करण्यासाठी आजच सर्वात उत्तम दिवस आहे. फक्त सुरवात करा आणि सतत प्रयत्नशील रहा.
