आपण नेहमीच एकतो की ''Success takes Time". याचा अर्थ असा की यश मिळण्यासाठी वेळ लागतो. पण सत्य परिस्थिती खूप वेगळी आहे.
कारण २०२४ मध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्ही किती तास काम करता या पेक्षा तुम्ही कस काम करता, कीती फोकसने काम करता, तुमच्या कामाची क्वालिटी काय आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे.
एका आश्चर्यकारक तथ्यावर विचार करा
जर तुम्हाला अस वाटत की यशस्वी होण्यासाठी दिवसातून तुम्हाला १ तासापेक्षा जास्त तास तुमच्या ध्येयासाठी द्यावे लागतील तर तुम्हीसुद्धा ९९% लोकांमध्ये सामील होता जे कधीचं त्यांचे ध्येय प्राप्त करू शकत नाही.
पण फक्त १ तास याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही मेहनत कमी घेणार किंवा हार्ड वर्क करणार नाही. ते सगळ तर येईल पण कोणतेही ध्येय गाठण्यासाठी लागणारा Mindset आणि दृष्टिकोण तुम्हाला बदलावा लागेल.
मी बिझी आहे = एक भ्रामक कल्पना
अनेकजण मी बिझी आहे, वेळ नाही या चिंतेत असतात. त्यांना वाटत खूप वेळ काम केलं म्हणजे खर काम केलं किंवा Productive बनलो. पूर्ण दिवस काम करण्यात जातो पण त्या हिशोबाने रिझल्ट मात्र कधीचं मिळत नाही. तुम्ही सुद्धा अस करत असाल तर हा एक प्रश्न तुम्ही स्वताला विचारा .
तूम्ही बिझी आहात पण नक्की कुठे?
1) नुसत सोशल मीडिया
सोशल मीडिया फीड असेच डिझाईन केले असतात की तुम्ही जास्तीत जास्त वेळ त्यावर घालवाल. Instagram एक रील बघायला घेतो, मग दोन होतात आणि बघता बघता 2 तास त्यातच जातात.
याच परिणाम असा होतो की एकतर वेळ वाया जातोच पण आपली पूर्ण एनर्जि आणि मोटिवेशन पण संपून जात.
2) डोक्यात नको ते विचार
Overthinking करणे, जे होणार नाही त्याची कल्पना करत बसणे, एक विचार मग दूसरा असा करत करत तुम्ही त्या विचारांमध्ये अडकुन राहता. त्यामुळे ना कोणत्या कामावर तुमच फोकस लागत ना कसली प्रोग्रेस तुमच्या लाइफमध्ये होते.
3) सतत वेगवेगळे Apps वापरत बसणे
जेव्हा तुम्ही एखाद काम करताना सोशल मीडिया Apps वापरता तेव्हा तुमचा फोकस Loose होतो. जरा वेळ यूट्यूब वापरल मग जरा वेळ Instagram मग पुन्हा Whats App अस चालूच राहत. अस केल्याने तुमच एकही काम पूर्ण होत नाही.
पण पण, तुमच्यासाठी एक चांगली बातमी
फोकस हे एक स्किल आहे जे तुमची विकसित करू शकता.
कल्पना करा की आजपासून तुम्ही दिवसाचा फक्त 1 तास तुमच्या ध्येयासाठी देणार आहात.
- टाइमर लावा
- फोन नाही डिस्ट्रॅक्शन नाही
- फक्त 1 तास, 1 ध्येय (No Multitasking)
तुम्ही स्वता शॉक व्हाल की फक्त 1 तास फोकस राहून तुम्ही कीती लवकर तुमच ध्येय प्राप्त करू शकता.
तुमच्या फोकस Muscle ला मजबूत कसं बनवाल?
कोणी जन्मजात फोकस घेऊन येत नाही. फोकस हे एक स्किल आहे जे तुम्ही सराव करून विकसित करू शकता.
जस जीममध्ये जावून आपण बॉडीचे इतर परत मजबूत बनवतो तसंच तुम्ही फोकस Muscle मजबूत करू शकता. फोकस Muscle वाढविण्यासाठी तुम्ही खालील टिप्सचा वापर करा.
1) छोटी सुरवात करा:
जोशमध्ये येऊन मोठ काम करायला घेऊ नका. माहीत आहे सुरवातीला जोश जास्त असतो. पण तो काही वेळ टिकतो म्हणून आधी 25 मिनिटे काम करा. जशी सवय होईल मग तुम्ही त्यामध्ये 5-5 मिनिटे वाढवा.
2) Distractions कमी करा:
मोबाइलचे नोटिफिकेशन सगळयात आधी बंद करा. खास करून ते सोशल मीडिया Apps चे नोटिफिकेशन जस की यूट्यूब, Instagram आणि Whats App इ. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे फोनला तुमच्यापासून लांब ठेवा. एवढ लांब की उठून घेताना पण कंटाळल येईल.
3) कामाची प्लॅनिंग आधी करा:
कोणत काम पहिल करायच आहे ते आधी ठरवा. जे काम तुम्हाला सगळ्यात जास्त महत्वच आहे त्याला Focus Time मध्ये करण्याचा प्रयत्न करा.
Conclusion
यशाच अर्थ अस होत नाही की तासंतास काम करत राहणे. यश म्हणजे की कमी काम करणे पण योग्य काम करणे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल.
Focused Work करूनच तुम्ही तुमच्यामधील क्षमता जागी करता जिचा वापर करून तुम्ही लाइफमध्ये मोठ्या गोष्टी मिळवू शकता.
म्हणून फोकस वाढवा. टाइम नाही. आपल्याकडे फक्त 24 तास असतात. पण कोण कीती फोकस आहे यावरून तो कीती यशस्वी आहे हे ठरविल जात.
