सतत कंटाळा येतो? अधिक एनर्जीसाठी 5 टिप्स | 5 Self-Improvement Tips for More Energy in Marathi

5 Self-Improvement Tips for More Energy in Marathi


काय दिवसभर तुम्हाला कंटाळा आलाय अस वाटत राहतं? कोणतेही काम करण्याचं Motivation तुमच्यामध्ये नाहीये? अस वाटणारे तुम्ही एकटे नाही आहात. 

आजकाल धावपळीच्या युगात अस वाटणे स्वाभाविक आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ५ सिंपल टिप्स ज्या तुम्हाला एक नवीन एनर्जी देतील. 

1. तुमच्या बॉडीला योग्य तो आहार द्या.

बाहेरच चटपट फास्ट फूड खाणे कमी करा. पाणीपुरी, वडापाव, चायनीज भेळ इ. खाताना अगदी चवदार लागतात. तुम्ही असे पदार्थ खाता पण हे सगळे पदार्थ तुमच्या एनर्जीला पूर्ण खाऊन टाकतात. 

शक्य तितकं घरच अन्न खाण्यास प्राध्यान्य द्या. तुमच्या आहारामध्ये भात, भाजी, भाकरी तसेच पुरेस प्रोटीन Add करा. तसेच फळे पण सोबत खा. चांगला आहार = चांगली एनर्जी.

2. झोप पुरेशी हवी. (त्याकडेच दुर्लक्ष होतय) 

आपल्या संगळ्यांना चांगलंच माहीत आहे की झोप किती महत्वाची आहे. पण आजकाल त्याकडे सगळ्यात जास्त दुर्लक्ष होत आहे. तुम्ही लास्ट टाइम कधी वेळेवर झोपलात? आठवत आहे का? नाही ना. 

सायन्स सांगत की मानवी शरीराला 7-8 तासाची झोप हवी. पुरेशी झोप घेततील तर तुमची एनर्जि लेवल मोठ्या प्रमाणात वाढेल. हव तर ट्राय करून बघा.

झोपायची वेळ ठरवा तसेच सकाळी उठायची वेळ ठरवा. अस केल्याने शरीराला एक सवय होते आणि याचा फायदा तुम्हाला दिवसभरात तुमच्या एनर्जिमध्ये झालेल्या वाढीने समजून येइल. 

3. निसर्ग तुमचा मित्र आहे (त्याला कधी भेटणार) 

थकवा जाणवत आहे? थोड चालायला बाहेर पडा पण मोबाइल घरी ठेवा. कसलाही विचार न करता चाला. डोक्यात काही न काही विचार येतील त्यांच्याकडे फक्त लक्ष द्या. 

काही स्टडीजमध्ये अस सिद्ध झाल आहे की जेव्हा तुम्ही बाहेर चालायला जाता, गार्डनमध्ये फेरफटका मारता त्याने Stress Hormones कमी होतात. आणि तुम्हाला जास्त Energetic वाटत. तुमचा मूड ठीक होतो. 

4. दिवशभरत थोडा व्यायाम हवा

तुम्ही आधीच थकलेल आहात, तुमच्यामध्ये एनर्जि नाहीये आणि मी तुम्हाला त्यात व्यायाम करायला सांगत आहे. हे कस शक्य होणार. 

पण मी काय सांगतो ते नीट एका आणि मग ठरवा. तुमच्यामध्ये एनर्जि नाही कारण तुम्ही व्यायाम करत नाही आणि एनर्जि तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही व्यायाम कराल. 

हे एक प्रकारच चक्र आहे. एनर्जि हवीय → व्यायाम करा → व्यायाम कराल → एनर्जि येईल. 

व्यायाम म्हणजे तुम्ही जीमला गेल पाहिजे अस नाही. चालणे, धावणे, पुश अप करणे किंवा योगा. जे हव ते करा पण काहीतरी Physical Activity तुम्हाला चांगली एनर्जि देवू शकते. 

आणि हो काहीजण बोलतील मी तर दिवसभर किती चालतो. ऑफिसला जाताना, इकडे तिकडे चालण तर होतच. पण अस चालण तुम्ही एक व्यायाम म्हणून घेऊ नका. जेव्हा तुम्ही व्यायाम करायच्या उद्देशाने चालता, धावता तेव्हा तुमच्या मेंदूला समजत की हा खरा व्यायाम आहे नुसत चालण नाही. 

5. म्युझिक एका (अस एखाद गाण जे तुमच्यासाठीच आहे) 

आपल्या प्रत्येकाच अस एखाद आवडत गाण असत जे एकून एक वेगळी एनर्जि अंगात येते. मूड अगदी मस्त होतो. 

एखाद गाण अस असेल ज्याचे बोल तुम्हाला एक नवीन एनर्जि देऊन जातात तर ते गाण तुम्ही एका. 

हा पण गाण एकायला यूट्यूब वर जाल पण नको त्या विडियोमध्ये अडकून राहू नका. 

नेहमी लक्षात ठेवा 

Consistency is key!

कोणत्याही कामात यशस्वी होण्यासाठी नियमितता हीच गुरुकिल्ली आहे. 

तुमच्या दैनंदिन जीवनात या सिम्पल टिप्सचा वापर करून तुम्ही स्वतामध्ये एक नवीन ऊर्जा, एनर्जि आणू शकता.  

जिथे तुमच्यामध्ये चांगली एनर्जि असेल तेव्हा तुम्ही काम पण चांगल कराल. काम चांगल कराल तर लाइफमध्ये कोणताही भाग असुदेत यश तुमच असेल एवढ नक्की. 

फॉलो करा 👉Threads App 
जॉइन करा 👉Dailyhunt App 

Post a Comment

Previous Post Next Post