7 चांगल्या सवयी ज्या तुम्हाला खूप आकर्षक बनवतात | 7 GOOD HABITS to Make You Attractive in Marathi

Tiny Habits to Make You Attractive in Marathi

GOOD HABITS: आकर्षक व्यक्तिमत्त्व असणं हे प्रत्येकाची इच्छा असते. पण आकर्षक व्यक्तिमत्त्व म्हणजे काय? आणि ते कसं विकसित करता येईल? आकर्षक व्यक्तिमत्त्व हे केवळ चांगल्या दिसण्याबद्दल नाही तर इतरांशी कसे संवाद साधायचा याबद्दल आहे. 

या ब्लॉग पोस्टमध्ये, आपण आकर्षक व्यक्तिमत्त्व विकसित करण्याच्या 7 मार्गांवर (GOOD HABITS) चर्चा करू:

1. अनोळखी व्यक्तीची मदत करणे: 

एखाद्या व्यक्ती तुम्हाला पत्ता विचारतो तेव्हा तुम्ही त्याची नीट मदत करता, ट्रेन मध्ये एका व्यक्तीची बॅगची चैन खुली होती तेव्हा तुम्ही ती बंद करून त्याची हेल्प केलीत आणि अशा अनेक छोट्या गोष्टी. अस करून तुम्ही नक्कीच त्या व्यक्तीचा दिवस बनवीता आणि इतरांच्या नजरेत एक आकर्षक बनता. 

2. कोणत्याही नात्यात प्रामाणिक राहणे: 

आता नात म्हटल की संगळ्याना वाटत की फक्त GF आणि BF वाल नात. नात म्हणजे फक्त मुलगा मुलगीमधील नाही. तुम्ही घरी आई बाबा असो की दादा ताई किंवा तुमच्या कॉलेजमधील मित्र तुम्ही नेहमीच त्याच्यासोबत प्रामाणिक राहता. आणि तुम्हाला माहीत नसेल पण ही गोष्ट तुम्हाला खूप आकर्षक बनविते. 

ही पोस्ट वाचा: 👉 प्रिय व्यक्तीसोबत नात सुधारायच आहे? मग हा एक प्रश्न स्वतः ला विचारा

3. स्वताची काळजी घेणे: 

तुम्ही बाहेरच जास्त खात नाही. तुम्ही दिवसातून कमीत कमी 30 मिनिटे तरी व्यायाम करता. तुम्ही तुमचे पैसे नीट मॅनेज करता. या सगळ्या गोष्टी करणे म्हणजे स्वताची काळजी घेणे असच आहे. आणि जरा विचार करा जर तुम्ही फिट आहात, तुमच्याकडे पुरेसा पैसा आहे तर तुम्ही नक्कीच लोकांच्या नजरेत एक आकर्षक व्यक्ती बनता. 

4. तुमच्या प्रियजणांची काळजी घेणे: 

तुम्ही स्वताची काळजी घेता पण तुमच्या आवडत्या लोकांची नाही घेत. यापेक्षा वाईट काहीच नसेल. म्हणून जशी तुम्ही स्वताची काळजी घेत आहात तशीच काळजी तुमच्या आई बाबा, दादा ताई आणि मित्र परिवार यांची घ्या. कारण आई बाबा जास्त वेळ तुमच्यासोबत राहणार नाहीत. म्हणून जोपर्यन्त ते आहेत त्यांना सगळ्या गोष्टी द्या. अस करून तुम्ही फक्त एक चांगला मुलगा (किंवा मुलगी) नाहीतर एक आकर्षक व्यक्ती बनता. 

5. तुमच्या प्रियजणांना वेळोवेळी सर्प्राइज देणे: 

तुमच्या GF ला कधी अचानक एखाद चॉकलेट किंवा गुलाब दिलय? कोणताही स्पेशल दिवस नाही तरी. देऊन बघा ती किती खुश होईल. काय तुम्ही तुमच्या आईला कधी एखादी साडी घेऊन दिली आहे? किंवा तुमच्या बाबाना एखाद वॉच किंवा शर्ट? देऊन बघा ते किती खुश होतील. सर्प्राइज देण्यासाठी स्पेशल दिवसाची वाट बघू नका. अस करून तुम्ही नक्कीच एक आकर्षक व्यक्ती बनता. 

ही पोस्ट वाचा: 👉 चूक झाली मान्य करा (कारण यात फायदा तुमचा आहे)

6. तुमच्या पेक्षा स्मार्ट लोकांकडून शिकणे: 

सतत शिकणे ही एक सुपरपॉवर आहे. कोणतेही गोष्ट शिकताना तुम्ही ते कोणाकडून शिकत आहात हे महत्वाचं नाहीये, तर तुम्ही शिकत आहात हे जास्त महत्वाचं आहे. शिवणारा व्यक्ती छोटा असो की मोठा, तुमचा इगोमध्ये न आणता स्किल शिकण्यावर फोकस करा. जो व्यक्ती फक्त शिकण्यावर फोकस असतो तो एक आकर्षक व्यक्ती नक्कीच असतो. 

7. जेव्हा तुमच्या कोणी आवाज चढवेळ, तेव्हा त्याच आधी एकून घेणे: 

समोरचा व्यक्ती आधीच तापलेला असतो. त्यात तुम्ही त्याच एकल नाही तर तर अजूनच चिडतो. अशा वेळी बेस्ट हेच असत की तो काय बोलत आहे हे शांतपणे एकून घेणे.  How to Win Friends and Influence People या बूकमध्ये सांगितल आहे जर तुम्हाला एखादा वाद जिंकायचा आहे तर टाळणे हाच बेस्ट मार्ग असतो. आणि जेव्हा तुम्ही ना कधी वाद करता ना कसल भांडण तेव्हा तुम्ही एक आकर्षक व्यक्ती बनता यात काही शंका नाही. 

निष्कर्ष:

आकर्षक व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी अनेक गोष्टी करता येतात. वर नमूद केलेल्या 7 चांगल्या सवयी (GOOD HABITS) तुम्हाला सुरुवात करण्यास मदत करतील. लक्षात ठेवा, आकर्षक व्यक्तिमत्त्व म्हणजे केवळ बाह्य सौंदर्य नाही तर तुमचं चरित्र, विचार आणि कृती यांचा समावेश आहे.

Post a Comment

Previous Post Next Post